Top 5 This Week

Related Posts

BREAKING

GADCHIROLI : रस्ते खराब, कचरा व्यवस्थापनही ठप्प; नागरिकांची नाराजी..

Desk | Gadchiroli

मुरखळ्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची प्रशासनाकडे धाव गडचिरोली  शहरालगतच्या नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतूक करणेही कठीण झाले आहे. या समस्येबाबत जिल्हा महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या ग्रीष्मा विवेक मून यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नवेगाव-मुरखळा परिसरातील विविध वॉर्डमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून, घराघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची नियमित उचल आणि योग्य व्यवस्थापन होत नसल्याने अस्वच्छतेची समस्याही वाढली आहे. स्थानिक नागरिकांकडून गेल्या वर्षभरापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी परिसराची पाहणी करून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती तसेच कचरा उचल व व्यवस्थापनासाठी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.  नागरिकांची मागणी स्पष्ट आहे — पावसाळ्यातील चिखलातून सुटका करून रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आणि परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.