Top 5 This Week

Related Posts

BREAKING

Brazil मध्ये भीषण विमान अपघात – 3 जणांचा मृत्यू

DESK|BRAZIL

बेलो हॉरिझोन्टे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंपुला विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच एक छोटे विमान नियंत्रण सुटून थेट तीन मजली निवासी इमारतीवर कोसळले.

या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये वैमानिक आणि सहवैमानिकाचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी विमानात असलेले दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अचानक खाली येताना दिसले आणि काही सेकंदांतच मोठा स्फोट झाला. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.

स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाड किंवा इंजिन फेल्युअरमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👉 अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा…