Top 5 This Week

Related Posts

BREAKING

AMRAVATI : MPSC परीक्षा प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचे प्रश्न अमरावतीत मोठीनाराजी

Desk | Amravati

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अमितजीत दीपके यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही, तर पुढील टप्प्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सध्या विविध प्रश्न आणि अडचणी उभ्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परीक्षा प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि आयोगाच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने विद्यार्थी या संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आणि भावना मांडत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. अमितजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आंदोलनासाठी संघटित होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. “स्वतः उभे करा आंदोलन” असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुढे येण्याची भूमिका मांडली. यावेळी एमपीएससीच्या कार्यपद्धतीबाबतही चर्चा झाली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ही त्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक

असल्याचे कार्यक्रमात सांगण्यात आले. परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करणे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दरम्यान, विवेक भीमनवार यांनी आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपली ओळख आणि जबाबदारी सार्वजनिकपणे स्पष्ट करावी, अशी मागणीही कार्यक्रमात करण्यात आली. पेपरफुटीला जबाबदार एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ओळख आणि मुख्यमंत्री यांच्यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांमध्येही या विषयावर मोठी उत्सुकता आणि नाराजी दिसून आली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आगामी काळात एमपीएससीशी संबंधित प्रश्नांवर आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे आता स्पर्धा परीक्षार्थी आणि संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे. अमितजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याची भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक केली जाईल, असा इशारा देण्यात आला. त्यामुळे अमरावतीतील या कार्यक्रमानंतर एमपीएससीच्या कारभाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासन आणि आयोगाकडून काय भूमिका घेतली जाते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.