Desk : nashik
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा भव्य ‘उलगुलान’ मोर्चा; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत भव्य ‘उलगुलान’ मोर्चा काढला. राज्यभरातून मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी आणि आंदोलक या मोर्चासाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. त्र्यंबक नाका ते शालिमारकडे जाणारे दोन्ही रस्ते मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मोर्चाच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातील प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या दिशेने जाणार होता. मात्र, आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले आणि त्यांनी तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. काही ठिकाणी करण्यात आलेले बॅरिकेडिंग हटवत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाल्याचेही सांगण्यात आले. आंदोलकांनी जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. या आंदोलनातील आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजे आश्रमशाळांमधील ‘सेंट्रल किचन’ योजना रद्द करण्याची. सेंट्रल किचनमधून तयार होणारे अन्न आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाते. मात्र, या अन्नाचा दर्जा पूर्वीच्या तुलनेत योग्य नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
त्यामुळे पूर्वीप्रमाणेच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. वसतिगृहात राहण्यासाठी निश्चित करण्यात आलेली २६ वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित इतर प्रश्नांवरही सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नाशिकसह पुणे आणि राज्यातील विविध भागांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काही विद्यार्थी मागण्यांसाठी उपोषणालाही बसले होते. मात्र, अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आता मोठ्या संख्येने नाशिकमध्ये एकत्र येत ‘उलगुलान’ मोर्चा काढला. या मोर्चामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. काही आंदोलक पारंपरिक आदिवासी वेशभूषेत सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने आपल्या
